Type Here to Get Search Results !

विनायक उर्फ अप्पी पाटील यांचा विजय निश्चित! - गोविंददादा पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा

 विनायक उर्फ अप्पी पाटील यांचा विजय निश्चित! - गोविंददादा पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा

पत्रकार परिषदेत गोविंददादा पाटील बोलताना  बाजूला अपक्ष उमेदवार अप्पी पाटील , गोपाळराव पाटील व प्रभाकर खांडेकर 

 चंदगड तालुक्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. हलकर्णी येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत अपक्ष उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांना समविचार आघाडीचा ठाम पाठींबा देण्यात आला आहे. यामुळे अप्पी पाटील यांचा विजय निश्चित असल्याची भावना गोविंददादा पाटील यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीसोबत बंडखोरी करत अप्पी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माघारीच्या दिवशी अर्ज मागे न घेतल्याने ते आता अधिक बळकट झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार गोपाळराव पाटील यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने कार्यकर्त्यांशी चर्चा करून अप्पी पाटील यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.


याचवेळी शिवसेना उबाठाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर खांडेकर, बळीराजा संघटनेचे नितीन पाटील, आजरा येथील संपत देसाई, जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण आणि मुंगेरीआण्णा, संजय पाटील यांनी देखील अप्पी पाटील यांना आपला ठाम पाठींबा जाहीर केला आहे.

या सर्व घडामोडींमुळे चंदगडच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. अपक्ष उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांचा विजय आता निश्‍चित मानला जात आहे, ज्यामुळे पुढील निवडणूक अत्यंत रोमहर्षक होणार आहे.


Post a Comment

0 Comments