अरुणा गोजे-पाटील यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव शाखेच्या वतीने सत्कार
बेळगाव, दि. ८ मार्च: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव शाखेच्या वतीने प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, साहित्यिक आणि पत्रकार अरुणा गोजे-पाटील यांचा "तेजस्विनी महाराष्ट्र सन्मान पुरस्कार" मिळाल्याबद्दल शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या सत्कार समारंभात एकदंत सोसायटीच्या सभागृहात ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा सडेकर मॅडम यांच्या हस्ते अरुणा गोजे-पाटील यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील, बेळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी.बी.पाटील, सदस्य मोहन पाटील, तसेच महिला कार्यकारणी सदस्या प्रा. मनीषा नाडगौडा, अस्मिता किल्लेकर, रोशनी हुंद्रे, संजीवनी खंडागळे, नेत्रा मेणसे, सविता वेसने आणि अस्मिता आळतेकर उपस्थित होते.
परिषदचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी यावेळी अरुणा गोजे-पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना, "नारीशक्तीचा हा सन्मान म्हणजे संपूर्ण बेळगावकरांसाठी अभिमानाची बाब आहे," असे मत व्यक्त केले. तसेच, जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण यांनीही त्यांचे कौतुक करत, महिलांसाठी त्यांनी उभारलेल्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा उल्लेख केला.
अरुणा गोजे-पाटील या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या बेळगाव शाखेच्या जिल्हाध्यक्ष, तारांगण ग्रुपच्या प्रमुख आणि संदेश न्यूजच्या संपादक असून, त्या महिलांना साहित्य क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी सतत विविध उपक्रम राबवत असतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments