Type Here to Get Search Results !

मॅग्नस निओ इलेक्ट्रिक स्कूटरचे यश ऑटोच्या वतीने बेळगावमध्ये अनावरण

 

मॅग्नस निओ इलेक्ट्रिक स्कूटरचे यश ऑटोच्या वतीने बेळगावमध्ये अनावरण

बेळगाव, दि. २१ मार्च  – पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी युक्त मॅग्नस निओ इलेक्ट्रिक स्कूटर यश ऑटोच्या वतीने आज कॉलेज रोड, बेळगाव येथील शोरूममध्ये अनावरण करण्यात आले. या भव्य कार्यक्रमाला बेळगावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम माजी अध्यक्ष महेश अनगोळकर  यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले

मॅग्नस निओ – आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त इलेक्ट्रिक दुचाकी
भारतीय बाजारपेठेसाठी विशेषतः डिझाइन आणि उत्पादन करण्यात आलेली मॅग्नस निओ ही ई-स्कूटर केवळ स्टायलिशच नाही तर कार्यक्षमतेचाही उत्तम नमुना आहे. एका चार्जमध्ये ११८ किमी पर्यंतचा प्रभावी मायलेज, ६५ किमी प्रति तासाचा उच्चतम वेग, तसेच बीएलडीसी मोटर आणि २.३ किलोवॅट एलएफपी बॅटरी असलेली ही दुचाकी ग्राहकांसाठी विश्वासार्ह पर्याय ठरणार आहे. याशिवाय, स्थिरतेसाठी १२-इंच टायर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे शहरी वाहतुकीसाठी हे एक उत्कृष्ट वाहन आहे. याला ७५००० किमी किंवा ५ वर्षांची वॉरंटी दिली जाणार असून, ही अद्यापपर्यंतची एकमेव अशी वॉरंटी असलेली ई-स्कूटर आहे.

मान्यवरांची उपस्थिती आणि पहिला ग्राहक सन्मान
या भव्य अनावरण सोहळ्यासाठी यश ऑटोचे मालक श्री. संजय मोरे, प्रमुख पाहुणे श्री. डी. बी. पाटील, श्री. महेश अनगोळकर आणि श्री. एम. वाय. घाडी उपस्थित होते. यावेळी स्मितल तरळे (आंबेवाडी) या मॅग्नस निओच्या पहिल्या ग्राहक ठरल्या. त्यांच्या हस्ते ई-स्कूटरचा पहिला अधिकृत स्वीकार करण्यात आला. कार्यक्रमाला नागेश देगस्कर, संदीप तरळे, विनायक मोरे, अजित मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हरित भविष्यासाठी मोठे पाऊल
या वेळी प्रमुख पाहुणे श्री. महेश अनगोळकर यांनी बेळगावकरांसाठी अशा अत्याधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. संजय मोरे यांचे कौतुक केले. प्रदूषणमुक्त वाहतुकीस चालना देण्यासाठी ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीने अधिकाधिक पर्यावरणपूरक वाहने बाजारात आणावीत, अशी त्यांची अपेक्षा व्यक्त केली.

शहरी वाहतुकीसाठी सर्वोत्तम पर्याय
आजच्या काळात वाढत्या इंधनाच्या किमती आणि पर्यावरणीय समस्यांमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. मॅग्नस निओ ही केवळ एक स्कूटर नसून, शाश्वत भविष्याकडे उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. शहरी प्रवास अधिक सुलभ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी ही स्कूटर एक उत्तम पर्याय ठरेल.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments