Type Here to Get Search Results !

चंदगड भाजपाची संघटनात्मक बैठक संपन्न

 चंदगड भाजपाची संघटनात्मक बैठक संपन्न


चंदगड (प्रतिनिधी ) :चंदगड तालुका भारतीय जनता पार्टीची आज संघटनात्मक बैठक पार पडली. यावेळी भाजपा प्रदेश सचिव मा.श्री.महेश जाधव, भाजपा कोल्हापूर(पश्चिम)जिल्हा अध्यक्ष मा.श्री.नाथाजी पाटील  यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  मार्गदर्शन केले. 

 यावेळी आ.शिवाजी पाटील यांनी गेल्या ५ वर्षात चंदगड तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. सर्वांनी केलेल्या मेहनतीमुळेच २०२४ च्या विधानसभेत विजय खेचून आणता आला असं त्यांनी सांगितलं.  येथून पुढेही तितक्याच ताकदीने भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. येणाऱ्या निवडणुकांमध्ये संघटना बांधणी खुप महत्वाची आहे एक परिवार म्हणून सर्वांनी काम करुन सर्व निवडणुकांमध्ये भाजपाचाच झेंडा फडकवण्यासाठी एकजूटीने ताकद लावू असेही ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी संघटनात्मक काम करत असताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणीही वरिष्ठांना सांगितल्या. 


  यावेळी माजी राज्यमंत्री श्री. भरमुआण्णा पाटील, श्री. धीरज करळकर (जिल्हाध्यक्ष भाजयुमो), डॉ.श्री.आनंद गुरव-आसंडोलीकर, श्री.दिपकदादा पाटील, श्री.सचिन बल्लाळ, श्री.हेमंत कोलेकर,श्री.शांतारामबापू पाटील, श्री.बबनकाका देसाई, श्री.जयवंत चांदेकर, श्री.बसवराज कंकणवाडी, श्री.यशवंत सोनार, श्री.संतोष तेली, श्री.जयवंत सुतार, श्री.दिग्विजय देसाई, श्री.विजय पाटील, श्री.विशाल बल्लाळ,श्री.अरूण मोकाशी, 

चंदगड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, मंडल अधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, सुपरवॉरीअर्स आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments