बेळगाव येथे पहिले राज्यस्तरीय जूडो अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य उद्घाटन
बेळगाव | २६ जुलै २०२५ : राज्यातील नवोदित आणि नामवंत जूडोपटूंना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय जूडो अजिंक्यपद स्पर्धेचे आज गांधी भवन, बेळगाव येथे भव्य उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त श्री. नारायण बारमणी आणि मिस्टर आशिया बॉडी बिल्डर श्री. सुनील आपटेकर उपस्थित होते.
ही स्पर्धा बेळगाव अॅमॅच्युअर जूडो असोसिएशनच्या पुढाकाराने, अध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत आणि उपाध्यक्ष डॉ. प्रकाश मुगळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली. यासाठी कर्नाटक राज्य जूडो संघटनेचे अध्यक्ष श्री. आनंद आणि सचिव श्री. रविकुमार यांचे सहकार्य लाभले आहे.
उद्घाटन समारंभात असोसिएशनच्या कार्यकारी समितीचे पदाधिकारी तसेच प्रशिक्षकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रमुख उपस्थित या मान्यवरांमध्ये: बसवराज कडली, उपाध्यक्ष , लक्ष्मण अडिहुडी, उपाध्यक्ष अॅड. पूजा गवाडे, सहसचिव प्रमोद सूर्यवंशी, खजिनदार ,संतोष कंग्राळकर, कार्यकारी सदस्य ,कु. भैरवी मुजुमदार, तांत्रिक समिती ,कु. रोहिणी पाटील, प्रशिक्षक व समन्वयक प्रशिक्षक त्रिवेणी उपस्थिती होती .
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर जूडो कलेवर आधारित नृत्यनाटिका सादर करण्यात आली, ज्यातून शिस्त, आत्मसंयम आणि बौद्धिक संतुलनाचे दर्शन घडले.
डॉ. सोनाली सरनोबत यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
![]() |
| डॉ. सोनाली सरनोबत मार्गदर्शन करताना |
यावेळी अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या मनोगतात म्हटले:"जूडो हा केवळ एक खेळ नाही, तर तो जीवनशैली आहे. खेळातून अनुशासन, मानसिक आणि शारीरिक बळ मिळते. ही स्पर्धा म्हणजे राज्यातील युवा खेळाडूंना एक सुवर्णसंधी आहे, जिच्या माध्यमातून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील.
या दोन दिवसीय स्पर्धेत राज्यभरातून ५०० हून अधिक खेळाडू, प्रशिक्षक व पंच सहभागी झाले असून, मोफत निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. यामुळे युवकांमध्ये खेळाविषयी उत्साह वाढीस लागणार आहे .
उद्घाटनप्रसंगी डीसीपी नारायण बारमणी यांनी खेळाडूंना उद्देशून सांगितले –"खेळात यशस्वी होण्यासाठी चिकाटी, आत्मशिस्त आणि सकारात्मक वृत्ती महत्त्वाची असते. जूडोसारखा खेळ जीवनातील अनेक संकटांशी सामना करण्याचे बळ देतो."
ही स्पर्धा रविवार २७ जुलै रोजी समारोप सोहळ्याने संपन्न होणार असून, यामध्ये विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा शक्ती, कौशल्य आणि आत्मनियंत्रणाचा उत्सव ठरत असून, बेळगाव हे पुन्हा एकदा जूडो आणि मार्शल आर्ट्सच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित झाले आहे.


Post a Comment
0 Comments