दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात अंगारिका संकष्टी निमित्त गणहोम व विशेष महाआरती
बेळगाव (प्रतिनिधी ) दि. 12 : बेळगाव येथील दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात आज मंगळवार अंगारिका संकष्टी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे यांच्या हस्ते भगवान गणेश यांचा विशेष अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर गणू मळ्यात गणहोम विधीची सुरुवात झाली.
गणहोम संपन्न झाल्यानंतर विशेष महाआरती घेण्यात आली व भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यात अभिजीत चव्हाण, विवेक पाटील, अजित जाधव, प्रथमेश कावळे, महेश सांबरेकर, अभी पवार, संजय मनगुतकर, अनिल मुतकेकर, दौलत जाधव, विनायक मनगुतकर, ज्योतिबा कावळे आणि रोशन नाईक यांच्या हस्ते गणहोम पार पाडण्यात आले.
पौरोहित्याचे कार्य बेळगावचे सुप्रसिद्ध भटजी छत्रे गुरुजी व त्यांच्या विद्यार्थीवर्गाने समर्थपणे पार पाडले. या प्रसंगी भाविकांनी मोठ्या श्रद्धा व उत्साहाने सहभाग घेतला.

Post a Comment
0 Comments