कडलगे बु. येथे मुळगांव-गोवा पायी दिंडीची सेवा ; संत ज्ञानेश्वरांची मूर्ती गावाला भेट
कारवे ( प्रतिनिधी ) आषाढी वारीनिमित्त मुळगांव (गोवा) येथील वारकरी संस्थेची पायी दिंडी काल कडलगे बु. येथे मुक्कामी होती. यावेळी ग्रामस्थांनी वारकऱ्यांची अत्यंत भक्तिभावाने सेवा करत आदरातिथ्य केले.
आज पहाटे दिंडीने पुढील प्रवासासाठी प्रस्थान करताना वारकऱ्यांनी गावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गावाचे प्रतिनिधी पिंटू हिशोबकर यांच्याकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आणि श्रीफळ भेटस्वरूप अर्पण करून प्रेमाची व भक्तीची आठवण दिली.
पिंटू हिशोबकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने ही भेट स्वीकारली. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती गावातील मंदिरात विधिवत ठेवण्यात आली.
यावेळी पिंटू हिशोबकर यांनी पायी दिंडीतील सर्व वारकऱ्यांना आषाढी वारीच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. ग्रामस्थांनीही वारकऱ्यांचा निरोप देत विठ्ठलनामाच्या गजरात दिंडीला निरोप दिला.

Post a Comment
0 Comments