कुद्रेमानीहून विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरकडे रवाना
कुद्रेमानी, दि. २३ : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे लाखो वारकरी आणि भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर कुद्रेमानी गावातूनही आज भाविकांचा एक समूह विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिभावाने पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.
"ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात आणि विठ्ठल नामस्मरण करत भाविकांनी प्रवासाला सुरुवात केली. विठुरायाचे दर्शन घेऊन कुटुंब, गाव आणि समाजाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
*यामध्ये रवि पाटील, सुरेश पाटील, बाळू कदम, शिवाजी गुरव, महादेव पाऊसकर, गावडू संभाजी पाटील, परशराम काकतकर, यल्लाप्पा काकतकर, महादेव मराठे , नाना पाटील, संजय पाटील ,गोमाणा सुतार , संतोष लक्काप्पा , पाटील ,जोतिबा धामणेकर ,यांचा समावेश आहे*
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचे प्रतीक मानली जाते. कुद्रेमानीतील भाविकांच्या या यात्रेला ग्रामस्थांनी शुभेच्छा देत त्यांचा निरोप दिला.

Post a Comment
0 Comments