Type Here to Get Search Results !

कोकण भागातील नागरिकांचा शिवाजीराव पाटील यांना जाहीर पाठिंबा

 कोकण भागातील नागरिकांचा शिवाजीराव पाटील यांना जाहीर पाठिंबा; विकासासाठी उचलले पाऊल


कोकण भागातील कुरणे-धामापूर ग्रामपंचायत विभागातील नागरिकांनी अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मागील आमदार व खासदारांनी भागाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित राहिलेल्या या भागातील नागरिकांनी स्वतःहून सावर्डे कार्यालयाला भेट देत पाठिंबा व्यक्त केला.

“शिवाजीभाऊंचा एक कॉल, प्रॉब्लेम सॉल” या विश्वासामुळे धामापूर भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांनी प्रचार दौऱ्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.

धामापूर भागाच्या समस्या आणि युवकांचे रोजगार:

कानुर बुद्रुक भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी औद्योगिक प्रकल्प प्रस्थापित होणे गरजेचे आहे. या दिशेने शिवाजीराव पाटील निश्चितच प्रामाणिक प्रयत्न करतील, असा विश्वास या भागातील जनतेने व्यक्त केला आहे. कोकण भागामध्ये उद्योगधंद्यांचा अभाव असल्यामुळे युवक बेरोजगार होत आहेत. शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


या कार्यक्रमाला धोंडीबा बाबू मोहिते, अंकुश लिंगोजी अंब्रुस्कर, गोविंद बाबू गुडुळकर, ईश्वर पोटफोडे, पावणोजी जग्गाप्पा पाटील, विजय गावडे, पावनाजी गावडे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments