अपक्ष उमेदवार अप्पी पाटील यांचा जरळी भागात जोरदार प्रचार; मतदारांशी थेट संवाद
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांनी जरळी भागात घराघरांशी संवाद साधत प्रचाराची धडाकेबाज सुरुवात केली. मतदारांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन देत त्यांनी जनतेचे लक्ष वेधले.
अप्पी पाटील यांनी या प्रचार दौऱ्यात मतदारांशी थेट गाठीभेट घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. "मी जनतेतून आलेला उमेदवार असून मतदारसंघाच्या विकासासाठी संपूर्ण वेळ झटणारा आहे," असे ते म्हणाले. त्यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधण्यावर भर दिला आणि मतदारांची मते जाणून घेतली.


Post a Comment
0 Comments