Type Here to Get Search Results !

विरोधकांनी असे चुकीचे आणि दिशाभूल करणारे प्रकार यापुढे थांबवले नाहीत, तर मी कायदेशीर कारवाई करीन

विरोधकांनी असे चुकीचे आणि दिशाभूल करणारे प्रकार यापुढे थांबवले नाहीत, तर मी कायदेशीर कारवाई करीन

पत्रकार परिषदेत अप्पी पाटील यांचा इशारा 


चंदगड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांना मिळत असलेल्या भरघोस जनसमर्थनामुळे विरोधक बिथरले असून, त्यांच्या प्रचाराला गालबोट लावण्यासाठी चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अप्पी पाटील यांनी आज तात्काळ पत्रकार परिषद बोलावून विरोधकांना इशारा दिला. "माझ्या प्रचारादरम्यान जनतेचा जो प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे विरोधक घाबरले आहेत. माझा विजय निश्चित आहे, हे त्यांनी ओळखले आहे, म्हणूनच खोट्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, अशा प्रकारच्या कोणत्याही हालचालींना मी व माझे समर्थक भीक घालणार नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.


विरोधकांना इशारा - अप्पी पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "विरोधकांनी असे चुकीचे आणि दिशाभूल करणारे प्रकार यापुढे थांबवले नाहीत, तर मी कायदेशीर कारवाई करीन. माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. हा लोकशाहीतील विरोधकांचा रडीचा डाव असून त्याला आम्ही सकारात्मक कामगिरीतून उत्तर देऊ."

अप्पी पाटील यांच्या प्रचाराला चंदगडमधील प्रत्येक गावागावातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना करण्याच्या त्यांच्या भूमिकेला सर्वसामान्य मतदार आपला पाठिंबा देत आहेत.

अप्पी पाटील यांनी आतापर्यंत केलेले सामाजिक कार्य, गोरगरिबांसाठी लढलेली लढाई, आणि मतदारसंघाच्या विकासासाठी दाखवलेली बांधिलकी यामुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय आहेत. "आम्हाला आपल्या समस्या जाणणारा आणि त्या सोडवणारा नेता हवा, आणि तो फक्त अप्पी पाटील आहेत," असे मतदार म्हणत आहेत.

अप्पी पाटील यांना मिळणारा भरघोस पाठिंबा पाहता विरोधक अधिकाधिक अस्वस्थ झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा अप्पी पाटील यांचा आरोप आहे.

"माझे अस्त्र फक्त जनतेचा विश्वास आहे. अशा खोट्या प्रचाराला आम्ही डगमगू देणार नाही. चंदगडच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून मी या निवडणुकीत उतरलेलो आहे, आणि यामध्ये यशस्वी होणार," असे अप्पी पाटील म्हणाले.

त्यांच्या या ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिकेमुळे चंदगडमधील निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे.


Post a Comment

0 Comments