चंदगडमधील जनतेचा शिवाजीभाऊंना अभूतपूर्व पाठिंबा: सावर्डे कार्यालय गजबजले
चंदगड मतदारसंघात अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील हे जनतेच्या मनात आपली खास जागा निर्माण करत आहेत. नेत्याकडून घरोघरी प्रचाराची परंपरा असतानाही शिवाजीभाऊंच्या कार्यप्रणालीत वेगळेपण आहे. तेथील नागरिक स्वतःहून त्यांच्या सावर्डे येथील कार्यालयाला भेट देत आहेत आणि जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहेत.
रविवारी, सावर्डे कार्यालय गजबजले होते, कारण तुडीये,शिपुर , आंबेवाडी, केंचेवाडी, फाटकवाडी (मातंग समाज), हंबीरे येथील श्रीकृष्ण संस्था, पाटणे महिला दलित वस्ती, कोकरे ग्रामस्थ, इनाम कोळिंद्रे सरपंच व ग्रामस्थ, सुंडी दलित समाज, कुदनुर व मुगळी तरुण मंडळ, शिरोळी महिला मंडळ, बुझवडे महिला, गुडेवाडी युवा मंच, काळमवाडी व धुळे ग्रामस्थ, आजरा युवा मंच, मासुरे व जंगमहट्टी ग्रामस्थ यांसह अनेक गावातील नागरिकांनी थेट कार्यालयात हजेरी लावली.
शिवाजी पाटील यांनी नेहमीच सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे आज जनतेचा विश्वास त्यांच्यावर अधिकाधिक वाढत आहे.
सामाजिक घटक, महिला, युवक आणि विविध संस्थांनी दाखवलेल्या पाठिंब्यामुळे चंदगड तालुक्याच्या राजकारणात शिवाजीभाऊंच्या नेतृत्वाचा प्रभाव अधिक दृढ झाला आहे. "नेता नाही, तर जनतेचा सेवक," अशा प्रतिमेतून त्यांनी निवडणुकीत वेगळ्या प्रकारचे वलय निर्माण केले आहे.
चंदगड तालुका आता शिवाजीभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीची नवी दिशा मिळवणार, असा विश्वास स्थानिकांमध्ये दिसून येत आहे.


Post a Comment
0 Comments