Type Here to Get Search Results !

चंदगड मतदार संघाचा विकास करण्यासाठी मी जीवाची रान करणार - शिवाजीराव पाटील

शिवाजीराव पाटील यांच्या विकासाच्या वचनांचा मेळावा


इनाम सावर्डे, चंदगड – चंदगड, आजरा व गडहिंग्लज मतदार संघात विकासाची गंगा वाहवण्यासाठी उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी इनाम सावर्डे येथे आयोजित भव्य मेळाव्यात विकासाच्या वचनांचा शब्द दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला समाजाच्या वतीने झालेल्या या मेळाव्यात शिवाजीराव पाटील यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

“माझे उद्दिष्ट केवळ मागासवर्गीयांपुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक बंधू-भगिनींचा विकास साधणे आहे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योजनांचा समावेश करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी रोहयो मंत्री भरमूअण्णा पाटील यांनी भूषवले. यावेळी गोकुळ दूधचे संचालक नामदेव कांबळे, प्रगतशील शेतकरी डॉ. सदानंद गावडे, लक्ष्मण गावडे, रामदास कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

शिवाजीराव पाटील यांनी सांगितले की, “चंदगड आजरा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी जीवाची रान करणार आहे. मला विश्वास आहे की, आपण एकत्र येऊन या भूमीत सकारात्मक बदल घडवू शकतो.”

या मेळाव्यात हजारो मतदारांनी उपस्थित राहून शिवाजीराव पाटील यांना समर्थन दिले. त्यांच्या या वचनामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि यामुळे आगामी निवडणुकांत शिवाजीराव पाटील यांना अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.

शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील या विकासाची गंगा, लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन अधिक उज्ज्वल भविष्यात प्रवेश करण्याची आशा देते.

शिवसंदेश NEWS

रवी पाटील ,चंदगड

Post a Comment

0 Comments