Type Here to Get Search Results !

महायुतीचा पराभव करणे हीच राजर्षी शाहू समविचार आघाडीची ओळख - नितिन पाटील

 महायुतीचा पराभव करणे हीच राजर्षी शाहू समविचार आघाडीची ओळख - नितिन पाटील

अप्पी पाटील यांची प्रचार रॅली उत्स्फूर्त प्रतिसाद

 शिवणगे येथे प्रचार फेरीत अप्पी पाटील सोबत रा.शाहू समविचार आघाडीचे नेते व कार्यकर्ते

चंदगड : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुक्तीचा पराभव करणे हीच राजर्षी शाहू समविचार आघाडीची ओळख असल्याचे बळीराजा संघटनेचे नेते नितिन पाटील यांनी जाहीर केले. अप्पी पाटील हे आघाडीचे अधिकृत उमेदवार असून, त्यांना आमदार केल्यास सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.


चंदगड जिल्हा परिषद माणगांव क्षेत्रातील वरगाव, गुडेवाडी, जट्टेवाडी, तांबुळवाडी, रामपूर, लाकुडवाडी, शिवणगे, लकिकटे आणि बसर्गे या गावांत अप्पी पाटील यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत अप्पी पाटील यांच्यासोबत गोपाळराव पाटील, कल्लाप्पाण्णा भोगण, गोविंददादा पाटील, नितिन पाटील आणि कॉ. संपत देसाई हे नेते उपस्थित होते.

प्रचारादरम्यान, नेतेमंडळींनी गावागावात जाऊन मतदारांना भेट दिली आणि अप्पी पाटील यांना आशीर्वाद मिळावा यासाठी मतदारांशी संवाद साधला. या दौर्‍यात अप्पी पाटील यांनी आपल्या विकासाच्या संकल्पनांची माहिती देऊन चंदगडच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्प व्यक्त केला.

प्रचार रॅलीला चंदगड मतदारसंघातील जनतेकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून, अप्पी पाटील यांची उमेदवारी दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


Post a Comment

0 Comments