महायुतीचा पराभव करण्यासाठी अप्पी पाटील यांना पाठिंबा - कॉ. संपत देसाई
आजरा (प्रतिनिधी ) :चंदगड विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीत महायुतीचा पराभव करण्यासाठी अप्पी पाटील यांना श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्याध्यक्ष आणि संविधान बचाव समितीचे समन्वयक कॉम्रेड संपत देसाई यांचा सक्रिय पाठिंबा मिळाला आहे.
कॉ. संपत देसाई यांनी स्पष्ट केले की, "अप्पी पाटील हेच सामाजिक वंचित विभागाचे खरे प्रतिनिधी आहेत. आजपर्यंत या विभागाचे प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलेले नाही. उच्च जातीय आणि सरंजामी शक्तींचे वर्चस्व रोखण्यासाठी अप्पी पाटील यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो आहोत."
तसेच, देसाई यांनी नमूद केले की चंदगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक ठोस वचननामा तयार करण्यात आला आहे, जो अप्पी पाटील यांनी स्वीकारला आहे. या वचननाम्यात तालुक्याच्या विकासाच्या सर्व प्रमुख मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे, आणि तो जनतेसमोर सादर करून मतदानाचे आवाहन करण्यात येणार आहे.
"यावेळी चंदगड मतदारसंघातून अप्पी पाटील हे निश्चितपणे विजय मिळवणार आहेत," असे आत्मविश्वासपूर्वक प्रतिपादन कॉम्रेड संपत देसाई यांनी केले.
या पाठिंब्यामुळे अप्पी पाटील यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळाले असून, महायुतीचा पराभव करण्यासाठी स्थानिक जनतेनेदेखील त्यांना प्रचंड पाठिंबा देण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment
0 Comments