"जनतेचा विश्वास हेच आमचे बलस्थान" - अप्पी पाटील
अप्पी पाटील यांच्या कामगिरीवर आमचा विश्वास - गोपाळराव पाटील
चंदगड व कानूर बुद्रूक येथे राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे अपक्ष उमेदवार विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांच्या प्रचाराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला. महिलांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचारफेरीत सहभाग नोंदवला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रचारफेरीत गोपाळराव पाटील, गोविंददादा पाटील, संजय पाटील, प्रभाकर खांडेकर, नितिन पाटील यांसारख्या स्थानिक नेत्यांनी आपल्या उपस्थितीने प्रचाराला बळ दिले. "अप्पी पाटील यांच्या प्रामाणिकतेने आणि कामगिरीवर आमचा विश्वास आहे," असे या नेत्यांनी मत गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केले.
महिलांचा सक्रिय सहभाग: विशेष आकर्षण
महिलांचा सक्रिय सहभाग हा प्रचाराचा प्रमुख भाग ठरला. "अप्पी पाटील यांच्या विकासकार्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवतो. त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी झटणार आहोत," असा निर्धार महिलांनी व्यक्त केला.
विकासाचे ध्येय आणि समाजसेवा
अप्पी पाटील यांनी कोपरा सभेत मतदारांशी संवाद साधताना भागातील सिंचन, शेती, रस्ते आणि पाणी यांसारख्या मुलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आश्वासन दिले. "गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी सदैव संघर्षशील राहीन," असे ते म्हणाले.
"जनतेचा विश्वास हेच आमचे बलस्थान"
"ही लढाई फक्त निवडणुकीची नाही, तर विचारांची आहे," असे मत व्यक्त करत अप्पी पाटील यांनी जनतेच्या विश्वासाला प्राधान्य दिले. "हा प्रचार नव्हे, तर जनतेचा विश्वास आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कानूर बुद्रूक येथे झालेल्या या सभेमुळे परिसरातील वातावरण अधिकच उत्साही झाले असून, अप्पी पाटील यांचा विजय सुनिश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे .

Post a Comment
0 Comments