चंदगड नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण: डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई यांची भेट
चंदगड: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती चंदगड शिक्षण विभागातर्फे नवनियुक्त शिक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबीरास नुकतीच डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई यांनी प्रेरणादायी भेट दिली. त्यांच्या सखोल मार्गदर्शनाने शिक्षकांसाठी विविध उपयुक्त बाबी उलगडल्या.
![]() |
| डायचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई यांचा स्वागत करताना सुनिल पाटील व भाऊ देसाई |
मार्गदर्शन करताना डॉ. भोई म्हणाले, "शिक्षक हा समाजप्रिय असावा. वाचन संस्कृती जोपासून विद्यार्थ्यांना ज्ञानाची गोडी लावावी." त्यांनी शिक्षकांना उपयुक्त पुस्तकांची यादी दिली आणि शिक्षणाचे क्षितीज कसे विस्तारावे यावर भर दिला. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत शिक्षकांनी 'दिक्षा' आणि 'स्वयंम' ॲप्सचा वापर करावा, ज्यातून त्यांना आपल्या गतीनुसार शिकण्याची संधी मिळते. तसेच शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कौशल्यावर भर देत, शिक्षक तंत्रस्नेही कसे होऊ शकतात, यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी, प्रशिक्षण समन्वयक सुनिल पाटील आणि भाऊ देसाई यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र भोई यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवींद्र पाटील यांनी मानले.
या शिबिरामुळे नवनियुक्त शिक्षकांमध्ये शिक्षणाच्या नव्या संधींवर लक्ष केंद्रित करण्याचे मार्गदर्शन मिळाले आहे, आणि या भेटीमुळे त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा संचारली आहे.



Post a Comment
0 Comments