हेब्बाळ गवळी वसाहत कार्यकर्त्यांचा नंदाताई बाभुळकर-कुपेकर यांना जाहीर पाठिंबा
चंदगड (प्रतिनिधी) – येथील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार श्रीमती नंदाताई बाभुळकर-कुपेकर यांना मतदारसंघातील विविध भागातून जोरदार पाठिंबा मिळत आहे. या पाठिंब्यात एक महत्त्वाची भर म्हणजे हेब्बाळ गवळी वसाहत येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला जाहीर समर्थन. श्री उमेश गवळी आणि श्री प्रकाश गवळी यांच्या नेतृत्वाखालील 20 ते 25 कार्यकर्त्यांनी नंदाताई बाभुळकर-कुपेकर यांना निवडणुकीत पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
हेब्बाळ गवळी वसाहत येथे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत या कार्यकर्त्यांनी आपले मत स्पष्ट करताना नंदाताईंच्या नेतृत्वाखालील विकासकामांवर विश्वास ठेवला असून त्यांचा विजयी होण्याचा संकल्प केला. श्री उमेश गवळी यांनी या वेळी बोलताना सांगितले की, "नंदाताई बाभुळकर-कुपेकर यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होऊ शकेल. त्यांची शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठीची भक्कम भूमिका लक्षात घेता आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत."
श्री प्रकाश गवळी यांनी नंदाताईंच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा आढावा घेत त्यांच्याशी सहकार्य करताना पुढे होण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने बाभुळकर-कुपेकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या पाठिंबा बैठकीत नंदाताई बाभुळकर-कुपेकर यांनीही कार्यकर्त्यांचे आभार मानले व सांगितले की, "आपण सर्वांच्या विश्वासावर काम करत राहणार असून जनतेच्या हितासाठी नेहमीच कटिबद्ध राहणार आहोत."

Post a Comment
0 Comments