चंदगडच्या उज्ज्वल भविष्यासाठी अप्पी पाटील यांनाच विधानसभेत पाठवा - गोपाळराव पाटील
चंदगड : चंदगडच्या सर्वांगीण विकासासाठी विनायक उर्फ अप्पी पाटील यांना आमदार करण्याचा निर्धार चंदगडचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केला. माणगाव येथे आयोजित प्रचार फेरीत गोपाळराव पाटील म्हणाले, “अप्पी पाटील हे सर्वसामान्य जनतेचा खरा प्रतिनिधी आहेत. चंदगडच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक आहे. आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत.”
राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्या प्रचारासाठी माणगाव भागातील बागीलगे, मलतवाडी, रामपूर, माणगांववाडी, लाकुरवाडी, शिवणगे, लकिकाटे, माणगाव आणि बसर्गे या गावांमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी अप्पी पाटील यांनी मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
![]() |
| प्रचार फेरीत समविचारी आघाडी |
या प्रचार फेरीत गोपाळराव पाटील यांच्यासोबत उबाठा गटाचे नेते प्रभाकर खांडेकर, कॉ. संपत देसाई, जिल्हा परिषद सदस्य कल्लापाण्णा भोगण, बळीराजा संघटनेचे नितिन पाटील, गोविंददादा पाटील आणि संजय पाटील उपस्थित होते.
नेत्यांनी एकमुखीपणे अप्पी पाटील यांना चंदगडच्या विकासासाठी योग्य उमेदवार मानून पाठिंबा देण्याचे आवाहन केले. वाड्या-वस्त्यांतील सुधारणा, बेरोजगारीची समस्या, आरोग्य सुविधा, पर्यटन विकास, तसेच बेळगाव-कोकण रेल्वे जोडणी या सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अप्पी पाटील हेच योग्य प्रतिनिधी असल्याचे नेत्यांनी सांगितले.



Post a Comment
0 Comments