Type Here to Get Search Results !

शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारासाठी महिलांची घरोघरी भेट, माणगाव परिसरात महिला रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारासाठी महिलांची घरोघरी भेट

माणगाव परिसरात महिला प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

माणगांव येथे उमेदवार शिवाजीराव पाटील यांचा प्रचार करताना महिलावर्ग 

चंदगड - चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या प्रचाराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवाजी पाटील यांच्या मूळ गावातील महिला कार्यकर्त्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी सक्रियपणे रस्त्यावर उतरल्या आहेत. माणगाव जिल्हा परिषद मतदार क्षेत्रातील माणगाव आणि आजूबाजूच्या गावांमध्ये महिलांनी रॅली काढून घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे.


या महिलांनी घराघरात भेट देत, शिवाजी पाटील यांच्या विजयासाठी महत्त्वाचे योगदान देण्याची विनंती केली. त्यांचे हे उपक्रम परिसरातील मतदारांमध्ये मोठा उत्साह निर्माण करत आहेत. रॅलीद्वारे शिवाजी पाटील यांच्या विविध विकासकामांची माहिती महिलांनी मतदारांपर्यंत पोहोचवली आहे.


शिवाजीराव पाटील यांच्या प्रचाराच्या आढाव्यानंतर महिलांनी स्पष्टपणे सांगितले की, "शिवाजी भाऊ जिंकणारच!" या आत्मविश्वासपूर्ण घोषणेमुळे मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मतदारसंघात शिवाजीराव पाटील यांची मजबूत पकड असल्यामुळे आणि महिलांनी दिलेल्या या पाठिंब्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता अधिक ठळक होत असल्याचे त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

Post a Comment

0 Comments