संजय साबळे यांना करवीर साहित्य परिषदे मार्फत पुरस्कार
संजय साबळे यांना ज्ञानेश्वर मुळे यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान
कोल्हापूर :- करवीर साहित्य परिषद आणि संत गाडगे महाराज अध्यासन यांच्या वतीने या वर्षीचा करवीर साहित्य पुरस्कार भारत सरकारचे परराष्ट्र सचिव श्री ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते श्री संजय साबळे यांना देण्यात आला .
दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे श्री संजय साबळे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत . त्यांची आतापर्यंत त्यांनी सतरा पुस्तके लिहिली आहेत . त्यांच्या ' आई शपथ खरं सांगतो ' या पुस्तकाला करवीर साहित्य पुरस्कार मिळाला .
https://youtu.be/b7QodBkDkuw?si=0y_EvQr4KW4aHoM8
संजय साबळे खेडूत शिक्षण संस्थेच्या दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये २० वर्षे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत . एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांना ओळखले जाते . विद्यार्थ्यांच्यात लेखन ,वाचन चळवळ वाढविण्या साठी श्री साबळे यांनी विविध पुस्तके लिहिली आहेत . मुलांना लिहिते करून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी संजय साबळे यांनी मुलांकडूनच विविध पुस्तके लिहून घेतली व प्रकाशीत केली . आठवणींच्या हिंदोळ्यावर , बाबांना समजून घेताना , शाळा विद्यार्थी आणि मी , एक तास आनंदाचा , असे करूया सूत्रसंचालन , साने गुरुजी एक विचार या पुस्तकांच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत .
यावेळी कुलगुरु डॉ .डी .के . मस्के , डॉ . एम . बी . शेख , डॉ सरोज बिडकर, जॉर्ज क्रुझ , एस .एन . पाटील , राजू साबळे , संध्या साबळे उपस्थित होते .
Post a Comment
0 Comments