कुद्रेमानी विविधोध्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ संचालक मंडळ निवडणूक 2024-2029
मतदान: 29 डिसेंबर 2024
ओरिजनल सत्ताधारी पॅनललाच विजयी करा! - चेअरमन जोतिबा बडसकर
कुद्रेमानी विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विद्यमान चेअरमन श्री. जोतिबा मारुती बडसकर आणि व्हाईस चेअरमन श्री. मल्लाप्पा गुंडू कदम यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत या संघाने विकासाची नवी दिशा घडवून आणली आहे.
पूर्वी एका पिशवीत असलेली संघाची इमारत आज गावाच्या मुख्य वेशीत सुसज्ज दुमजली इमारतीच्या स्वरूपात उभी आहे. संघाने राजकारणापलीकडे जात शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जपुरवठा, खते, बियाणे, आणि शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गरजा भागवण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे.
विकासाची वाटचाल सुरूच राहणार -
विद्यमान पॅनलने संघाची पत वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तसेच, भविष्यात शेतकऱ्यांच्या गरजांसाठी सुपर मार्केट सुरू करण्याचा संकल्प विद्यमान चेअरमन जोतिबा बडसकर व व्हा . चेअरमन मल्लाप्पा कदम यांनी व्यक्त केला आहे.
विरोधकांचे स्वार्थी राजकारण उघडे पडले
संघाने राजकारणविरहित विकास साधल्यामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. स्वार्थी प्रवृत्तीमुळे विरोधकांनी स्वतंत्र चूल मांडली आहे. मात्र, सुज्ञ सभासदांनी अशा प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करून विकासाची परंपरा टिकवण्याचा निर्धार केला आहे.
सभासदांचे एकमत:
सत्ताधारी पॅनलच्या कार्याचा आढावा घेताना सभासद मतदार एकच मत व्यक्त करत आहेत:
"विकास आणि प्रामाणिकपणासाठी सत्ताधारी पॅनललाच पुन्हा संधी द्या!"
29 डिसेंबरला मतदान करा आणि विकासाचा मार्ग निवडा.
सत्ताधारी पॅनलला विजयी करून गावाचा विकास कायम ठेवा!

Post a Comment
0 Comments