क्रेडाईचे नूतन अध्यक्ष युवराज हुलजी यांचा साहित्य परिषद व शिवसंदेश भारततर्फे सत्कार
बेळगाव : क्रेडाईचे नूतन अध्यक्ष युवराज हुलजी यांची निवड झाल्याबद्दल शिवसंदेश भारत, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात परिषदचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील, शिवसंत संजय मोरे, संतोष मंडलिक, एम. वाय. घाडी, संदीप तरळे, नारायण कणबरकर, दत्ता उघाडे, निवृत्त सुभेदार के. आर. मोटर, राम ठोंबरे, प्रतिभा घाडी, चंद्रज्योती देसाई, जोतिबा बडसकर, सदाशिव पाटील, तानाजी पाटील आणि विक्रम तुडयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी युवराज हुलजी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "बांधकाम व्यावसायिकांसमोरील आडचणी दूर करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या गृहप्रकल्पांच्या उभारणीसाठी विशेष प्रयत्न केले जातील. हा सत्कार म्हणजे माझ्यासाठी घरच्या माणसांनी दिलेला सन्मान आहे."
हुलजी हे यापूर्वी क्रेडाईचे सेक्रेटरी होते. तसेच, ते बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संचालकही आहेत. एका तरुण अध्यक्षाची निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
कार्यक्रमात शिवसंत संजय मोरे आणि ॲड. सुधीर चव्हाण यांनीही हुलजी यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रतिभा घाडी यांनी मानले.


Post a Comment
0 Comments