मराठी अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी मोहन पाटील यांची निवड
चंदगड: कारवे येथे झालेल्या चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वार्षिक सहविचार सभेत कार्यकारणीची निवड करण्यात आली . बैठकीच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा संघटक एम. एन. शिवणगेकर होते.
कार्यकारणी मध्ये अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ अध्यापक मोहन पाटील उपाध्यक्ष कमलेश कर्णिक
कार्याध्यक्ष राघवेंद्र इनामदार,सचिव एस पी पाटील , बी.एन पाटील,खजिनदार व्ही. एल. सुतार ,तालुका समन्वयक रवी पाटील ,प्रवक्तेपदी एच. आर. पाऊसकर,संपर्क प्रमुख एम. वाय. पाटील ,महिला प्रतिनिधी सुजाता कोरवी ,प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र शिवणगेकर, फिरोज मुल्ला
यांची निवड करण्यात आली या सभेमध्ये मराठी विषयासमोरील समस्या याविषयी चर्चा करण्यात आली मराठी अध्यापक संघामार्फत वर्षभरात बाल साहित्य संमेलन, गुणवंत विद्यार्थी, शिक्षक यांचा गौरव,साहित्यिक आपल्या भेटीला, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,हस्ताक्षर सुधार शिबिरवर्ग,कथाकथन स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे नियोजन करण्याचे ठरले.
या बैठकीला आनंत पाटील,एच. आर.पाऊसकर,बी. एन.पाटील संजय साबळे, उपस्थित होते. आभार सुरेश नाईक यांनी मानले.

Post a Comment
0 Comments