Type Here to Get Search Results !

यश ऑटो, गणेशपूर येथे 29 एप्रिल रोजी शिवजन्मोत्सव सोहळा

 यश ऑटो, गणेशपूर येथे 29 एप्रिल रोजी शिवजन्मोत्सव सोहळा


बेळगाव (प्रतिनिधी) :शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! यश ऑटोमोबाईल्स, गणेशपूर (राकसकोप रोड), बेळगाव येथे सालाबादप्रमाणे यंदाही भव्य शिवजन्मोत्सव सोहळा मंगळवार, दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता आयोजित करण्यात आला आहे.


या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तुलनाकार व समीक्षक प्रा. डॉ. आनंद पाटील-संकपाळ यांचे "शोध दोन सम्राटांचा : शहाजी-शिवाजी" या विषयावर होणारे विचारमंथन! यावेळी डॉ. आनंद पाटील - संकपाळ लिखित "मराठा साम्राज्य सूर्य वजीर शहाजी भोसले" या ग्रंथाचे प्रकाशन सोहळाही संपन्न होणार आहे.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. युवराज हुलजी, अध्यक्ष, क्रेडाई बेळगाव हे राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून राष्ट्रपती सन्मानित चित्रकार व नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अल्पना सोपान चौगुले (कोल्हापूर) या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या सोहळ्यात मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असून, उपस्थित प्रत्येक शिवप्रेमींना डॉ. चौगुले यांच्या राज्याभिषेक चित्राच्या प्रती भेटस्वरूप प्रदान केल्या जातील.

यावेळी तानाजी पाटील व कु. देवयानी पाटील यांचा कराओके पोवाडा व शिवगीते सादरीकरण होणार आहे .


शिवसंत संजय आर. मोरे (संचालक, यश ऑटो) व मोरे परिवार व मित्रमंडळी यांनी सर्व शिवप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


विशेष उल्लेखनीय म्हणजे, गेल्या 28 वर्षांपासून व्यवसायाच्या ठिकाणी शिवजयंती साजरी करणारे शिवभक्त संजय मोरे हे आपल्या वैयक्तिक श्रद्धेतून हा सोहळा अखंडतेने साजरा करतात. केवळ साजरीकरणापुरते मर्यादित न राहता, व्याख्यानातून प्रबोधन करण्याचा त्यांचा उपक्रम उल्लेखनीय आहे.दरवर्षी  गड मोहीम आयोजित करतात .कार्यक्रम स्थळी समाजातील गुणवंत व कर्तृत्ववान लोकांचा सन्मान व सत्कार करतात .

एक अनोखा इतिहासप्रेमाचा सोहळा अनुभवण्यासाठी शिवप्रेमींसाठी सुवर्णसंधी!

Post a Comment

0 Comments