Type Here to Get Search Results !

उद्या शंकर पाटील संकलित 'स्वर सुवर्ण' संग्रहाचे प्रकाशन ;भक्तिरसाचा सोहळा

 शंकर पाटील संकलित 'स्वर सुवर्ण' संग्रहाचे प्रकाशन व भक्तिरसाचा सोहळा ; 450 महिलांचा सामूहिक भजन कार्यक्रम

परमपूज्य मराठा जगदगुरू वेदांताचार्य श्री श्री श्री मंजूनाथ भारती महास्वामीजींच्या हस्ते प्रकाशन 


बेळगाव :संगीत साधनेसाठी आयुष्य वाहिलेल्या, समाजाला भक्तीमार्गाकडे नेणाऱ्या आदरणीय श्री. शंकरराव पाटील (किणये) यांच्या अमूल्य कार्याचा गौरव करण्यासाठी एक भव्य सोहळा आयोजिला आहे. रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 वाजता, श्री अन्नपूर्णेश्वरी मंगल कार्यालय, वडगाव-बेळगाव येथे 'स्वर सुवर्ण' मराठी गीतांचा संग्रह (चौथी आवृत्ती) प्रकाशित होणार आहे.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठा जागृती निर्माण संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय गोपाळराव नारायणराव बिर्जे भूषवणार आहेत.

परमपूज्य मराठा जगदगुरू वेदांताचार्य श्री श्री श्री मंजूनाथ भारती महास्वामीजी आणि महापौर मा. मंगेश पवार यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

या सोहळ्यात माननीय श्री. रविराज हेगडे (संचालक, अन्नपूर्णेश्वरी मंदिर व मंगल कार्यालय) यांचा सत्कार होणार असून प्रमुख वक्ते म्हणून श्री. एस. डी. पाटील (मुख्याध्यापक, धर्मवीर संभाजी हायस्कूल, बैलूर) आपले विचार मांडणार आहेत.


विशेष आकर्षण! सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 450 महिलांचा एकत्रित सामूहिक भजन कार्यक्रम आयोजित केला आहे. भक्तिरसाने न्हालेल्या या अविस्मरणीय क्षणांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रेमपूर्वक सादर - मराठा जागृती निर्माण संघ, बेळगाव

निवेदिका म्हणून सौ. शीतल पाटील (मंडोळी हायस्कूल) व सौ. चंद्रज्योती देसाई (संगीत शिक्षिका, ज्ञानप्रबोधन मंदिर, बेळगाव)

Post a Comment

0 Comments