Type Here to Get Search Results !

३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन कराड येथे आयोजन

३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन कराड येथे आयोजन


कराड (जि. सातारा) येथे दि. ९ व १० मे २०२५ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत संपन्न होणार असून, साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झाले आहे.

या संमेलनाचं उद्घाटन मा. खा. शरदचंद्रजी पवार (माजी केंद्रीय कृषी मंत्री) यांच्या हस्ते दि. ९ मे रोजी दुपारी ४.०० वा. टाऊन हॉल, कराड येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक मा. प्रविण गायकवाड यांची निवड झाली असून, स्वागताध्यक्ष म्हणून मा. श्रीनिवास पाटील (माजी राज्यपाल सिक्कीम) यांची नियुक्ती झाली आहे.

या दोन दिवसीय संमेलनात नवोदित लेखकांसाठी २०० हून आधिक नवोदितकवींचे संमेलन, चर्चासत्र आणि परिसंवाद अशा विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. शरद गोरे, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांनी या संमेलनाचे निमंत्रक म्हणून सर्व साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे साहित्य व सामाजिक क्षेत्रातील नामवंत मान्यवरांची उपस्थिती:

  • मा. पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री)
  • मा. आमदार जयंतराव पाटील (माजी अर्थमंत्री)
  • मा. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले
  • मा. विशाल पाटील (संपादक लोकशाही न्यूज)
  • मा. रामकृष्ण वेताळ
  • मा. शुभांगीताई काळभोर
  • मा. सीमाकवी रवींद्र पाटील (कर्नाटक अध्यक्ष, अ.भा.म.सा.प.)

मुख्य संयोजनात डॉ. हनुमंत चिकणे, डॉ. नितीन नाळे, विक्रम शिंदे, विकास भोसले, संदीप पवार, आणि सुषमा आलेकरी यांचा समावेश आहे.

मराठी नवोदित साहित्यविश्वाला नवी दिशा देणारे हे संमेलन साहित्य रसिकांना पर्वणीच ठरणार आहे !

Post a Comment

0 Comments