Type Here to Get Search Results !

सीमाकवी रवींद्र पाटील कराड संमेलनात विशेष अतिथी ; बेळगाव नवोदित कवींनाही आमंत्रित

बेळगावचा अभिमान! 

सीमाकवी रवींद्र पाटील यांना अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात विशेष अतिथी आणि निमंत्रित कवी म्हणून आमंत्रित !

बेळगावच्या नवोदित कवींना आमंत्रित 


कराड | २ मे २०२५
साहित्य क्षेत्रात आपल्या भाषिक सशक्ततेने आणि सीमाभागातील वास्तवदर्शी कवितांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदचे कर्नाटक अध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांना, ३१व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात विशेष अतिथी व निमंत्रित कवी म्हणून सन्मानित करण्यात येत आहे. हे संमेलन ९ व १० मे २०२५ रोजी कराड (जि. सातारा) येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

उद्घाटनाचा भव्य सोहळा
संमेलनाचे उद्घाटन दि. ९ मे रोजी दुपारी ४.०० वा. कराड येथील टाऊन हॉलमध्ये मा. खा. शरदचंद्रजी पवार (माजी केंद्रीय कृषी मंत्री) यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्ष म्हणून मा. प्रविण गायकवाड (प्रख्यात साहित्यिक) व स्वागताध्यक्ष म्हणून मा. श्रीनिवास पाटील (माजी राज्यपाल, सिक्कीम) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

२५० हून अधिक कवींसह विविध सत्रांची रेलचेल
या दोन दिवसीय साहित्य महोत्सवात नवोदित लेखकांसाठी परिसंवाद, चर्चासत्रे, काव्यवाचन अशा भरगच्च साहित्यसत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रवींद्र पाटील यांची कविता सामाजिक जाणिवा, सीमावासीयांचे अनुभव आणि ग्रामीण वास्तव यांना कलात्मक शब्दांत बांधून सादर केली जाणार आहे.

कविसंमेलन सत्र तिसरे – एक काव्यमय पर्वणी!
दि. ९ मे रात्री ९.०० वा. होणाऱ्या तिसऱ्या कविसंमेलन सत्राचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध कवी व गझलकार मा. फरजाना इक्बाल डांगे (कराड) यांच्याकडे असून, यामध्ये रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगावातील नवोदित कवी आपल्या प्रतिभेचा झंकार मांडणार आहेत.

सहभागी कवी (बेळगाव विभाग):

  • अस्मिता आळतेकर
  • शुभदा खानोलकर
  • अक्षता येळ्ळूरकर
  • सुवर्णा पाटील
  • रोशनी हुंदरे
  • किरण पाटील
  • पूजा सुतार
  • मनिषा नाडगौडा
  • अशोक सुतार
  • संजीवनी खंडागळे
  • व्यं. कृ. पाटील
  • श्रीकांत काकतीकर
  • डी. एस. गुरव (महागाव)

संमेलनात बेळगावचा भव्य सहभाग
या प्रसंगी अ.भा. मराठी साहित्य परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण व कार्यकारिणी सदस्य संमेलनस्थळी उपस्थित राहणार असून, बेळगावच्या साहित्यिकांची चमकदार उपस्थिती या संमेलनाचे वैभव वाढवणार आहे.

साहित्यप्रेमींना निमंत्रण
डॉ. शरद गोरे (राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा.म.सा.प.) यांनी संमेलनाचे निमंत्रक म्हणून सर्व रसिक, अभ्यासक, लेखक व कवी यांना या साहित्ययात्रेत सहभागी होण्याचे खुले आवाहन केले आहे.


सीमावर्ती शब्दांना मिळतेय राष्ट्रीय व्यासपीठ, आणि या गौरवाचा सार्थ अभिमान 

 बेळगाव परिषदेच्या वतीने सीमाकवी रवींद्र पाटील व सहभागी कवी मंडळींना हार्दिक शुभेच्छा!


Post a Comment

0 Comments