उद्या लक्ष्मीनगर - हिंडलगा येथे श्री महालक्ष्मी देवीचा ३३ वा वार्षिकोत्सव
बेळगाव( प्रतिनिधी )
हिंडलगा -बेळगाव लक्ष्मीनगर येथील श्री महालक्ष्मी कल्चरल ॲण्ड सोशल युनियन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री महालक्ष्मी मंदिरात गुरुवार, दि. २२ मे २०२५ रोजी श्री महालक्ष्मी देवीचा ३३ वा वार्षिकोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होणार आहे.
या उत्सवाची सुरुवात सकाळी ६ वाजता श्री महालक्ष्मी मूर्तीच्या अभिषेकाने होणार असून, ८ वाजता पालखी पूजन व प्रदक्षिणा, यानंतर श्री माऊली भजनी टाळ पथक, शिनोळी बुद्रुक यांचे पालखी सोहळ्यात टाळ पथक सादरीकरण होणार आहे. सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण पूजा होईल.
कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण बिंदू म्हणजे मराठा जगद्गुरु श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी (पिठाधिपती, गोसाई महासंस्थान मठ, बेंगळूर) यांचे प्रवचन सकाळी ११ वाजता होणार आहे.
त्यानंतर महाआरती व ओटी भरणे कार्यक्रम (१२ ते १ वाजता) आणि दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ७ वाजता महाआरतीने कार्यक्रमाचा समारोप होईल.
कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक अध्यक्ष दत्ताजी कानुरकर, उपाध्यक्ष कृष्णा बाडीवाले, कार्यदर्शी प्राजक्त केकरे, खजिनदार सुरेश पाटील व संचालक सदस्य राजन टाकळकर, शंकर गर्डे, किशोर उरणकर, श्रीकांत लोकरे, दिनकर गवस, शिवाजी बाडीवाले, सुर्यकांत गावडे, नामदेव रेडेकर, धिरज भाटे, सच्चिदानंद चिकोर्डे, सतिश दिवटे, जगदिश पाटील, नंदेश दळवी व रमेश रेडेकर
या सर्व संचालक मंडळाने सर्व भाविकांना आवाहन केले आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या कृपाशीर्वाद घ्यावा.

Post a Comment
0 Comments