लक्ष्मीनगर येथे श्री महालक्ष्मी देवीचा ३३ वा वार्षिकोत्सव भक्तिभावात उत्साहात साजरा
बेळगाव (शिवसंदेश न्यूज): हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा ३३ वा वर्धापन दिन व वार्षिक यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात, श्रध्देने आणि आनंदात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पालखी पूजनाने झाली. टाळ-मृदंगांच्या गजरात निघालेली पालखी मिरवणूक संपूर्ण परिसरात भक्तिभावाची ऊर्जा पसरवणारी ठरली. भजनी महिला मंडळाने व गायक तानाजी पाटील यांच्य “कराओके गाण्याच्या” अभंगाने वातावरण मंत्रमुग्ध केलं, तर बालगोपाळांच्या विठ्ठल-रखुमाई वेशभूषेतील सादरीकरणाने वारीसदृश भावनिर्झर साकारला.
मंदिरात पारंपरिक कुंकुमार्चन विधी, श्री सत्यनारायण पूजा मानकरी अजय खलाटे - पाटील , पालखी पूजन - युवानेते आर एम चौगूले व हिंडलगा ग्राम पंचायत उपाध्यक्षा चेतना पाटील यांनी केले . यंदाची लक्षवेधी आकर्षक आरास सौ. लक्ष्मी कानूरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
![]() |
| श्री माऊली महिला टाळ पथक शिनोळी बु . |
यावेळी उत्सवाच्या विशेष सन्मानिय म्हणून बेंगळुरू गोसावी मठाचे मराठा जगद्गुरू वेदांतचार्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी उपस्थित होते.
त्यांच्या सुसंवादातून स्त्रीशक्ती, भक्ती, संस्कार व सनातन धर्म या .विषयांवर सखोल विचार मांडण्यात आले. “देवाला मनापासूनची भक्ती हवी, सोने-चांदी नव्हे” असा त्यांचा संदेश उपस्थितांना अंतर्मुख करणारा ठरला.
त्यानंतर त्यांच्याच अधिष्ठानाखाली झालेल्या महाआरतीत शेकडो भाविक सहभागी झाले. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.
महिला सहभाग ठरला विशेष आकर्षण –
श्री माऊली महिला टाळ पथक शिनोळी (बु) व लक्ष्मीनगरच्या महिला भगिनींनी अभंगगायन व नृत्यमय सादरीकरण करून सोहळ्याला भक्तिरसात रंगवले.
यावेळी स्थानिक महिला अक्षता हिरोजी, मोहिनी पाटील, उज्ज्वला बेळगावकर, रश्मिता उरणकर, लक्ष्मी कानूरकर, वनिता चव्हाण, संपदा पाटील, धनश्री दळवी, सोनल दळवी, अनिता दळवी, जागृती नाईक, कविता बडीवाले , वर्षा खामकर व गायत्री पाटील यांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.
दहावीतील गुणवंत विद्यार्थी यामध्ये अनुष्का भाटे 93.6% , हर्षदा बेळगांवकर 77% ,श्रीया पाटील 95% व संयुक्ता भातकांडे 95% या विद्यार्थ्यांनींचा मराठा जगद्श्रीगुरू मंजुनाथ स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाला सामाजिक भान प्राप्त झाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती अध्यक्ष दत्ताजीराव कानूरकर, उपाध्यक्ष कृष्णा बडीवाले, सदस्य प्राजक्त केंकरे, सुरेश पाटील, राजन टाकळकर, दिनकर गवस, शिवाजी बडीवाले, किशोर उरणकर, सच्चिदानंद चिकोर्डे, शंकर गर्डे, श्रीकांत लोकरे, नामदेव रेडेकर, धिरज भाटे, सतिश दिवटे, नंदेश दळवी, रमेश रेडेकर यांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी पत्रकार सीमाकवी रवींद्र पाटील व गायक तानाजी पाटील यांची उपस्थिती लक्षणीय होती.
या ३३ व्या वर्धापन दिनाने लक्ष्मीनगरच्या धार्मिक-सांस्कृतिक वारशाला नवसंजीवनी दिली, आणि भक्तांच्या मनात महालक्ष्मी मातेबद्दल अधिक श्रद्धा जागवली.
![]() |






Post a Comment
0 Comments