३१व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार यांना निमंत्रण
लोकनेते शरद पवार यांना नियंत्रण देताना डॉ. शरद गोरे
कराड | प्रतिनिधी
दिनांक ९ व १० मे २०२५ रोजी कराड (जि. सातारा) येथे आयोजित होणाऱ्या ३१व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन लोकनेते मा. शरदचंद्रजी पवार (माजी केंद्रीय कृषी मंत्री) यांच्या शुभहस्ते होणार आहे. या उद्घाटनासाठी त्यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आले असून, हा सन्मानपर क्षण साहित्यप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी मा. शरद पवार यांची सदिच्छा भेट घेऊन संमेलनाचे निमंत्रण दिले. या भेटीत साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हनुमंत चिकणे हेही उपस्थित होते. संमेलनाची संपूर्ण रूपरेषा, उद्दिष्टे आणि नवोदित कवींना मिळणारे व्यासपीठ याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
संमेलनाचे वैशिष्ट्य:
- प्रसिद्ध साहित्यिक मा. प्रविण गायकवाड संमेलनाध्यक्षपदी तर माजी राज्यपाल मा. श्रीनिवास पाटील स्वागताध्यक्ष भूषविणार आहेत.
- संमेलनात देशभरातून ९०० साहित्यक व २५० हून अधिक नवोदित कवी सहभागी होणार
- चर्चासत्र, परिसंवाद, कविसंमेलन अशा बहुरंगी साहित्यिक सत्रांचे आयोजन
- बेळगावसह सीमाभागातील नवोदितांना मिळणार अभिव्यक्तीचे व्यासपीठ
डॉ. शरद गोरे यांनी सांगितले की, “हे संमेलन नव्या पिढीला साहित्यप्रवासासाठी प्रेरणा देणारे ठरेल. मा. शरद पवारसाहेबांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्या हस्ते उद्घाटन होणे ही मोठी गौरवाची बाब आहे.”
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले हे संमेलन मराठी साहित्यात नवचैतन्य फुंकणार, असा विश्वास साहित्य परिषदेने व्यक्त केला आहे.
Post a Comment
0 Comments