Type Here to Get Search Results !

संजय साबळे यांची STARS प्रकल्पासाठी गौरवशाली निवड

संजय साबळे यांची STARS प्रकल्पासाठी गौरवशाली निवड

नाविन्यपूर्ण शिक्षणाची दखल!



कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या STARS (Strengthening Teaching-Learning and Results for States) या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत मराठी (प्रथम भाषा) विषयातील पायाभूत चाचणी निर्मितीसाठी चंदगड तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांची निवड करण्यात आली आहे.


शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांची निवड करून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी योगदान देण्याची संधी मिळवणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे. संजय साबळे यांनी मराठी भाषेच्या अध्यापनात नवनवीन प्रयोग व विद्यार्थाभिमुख उपक्रम राबवले आहेत. याची दखल घेत त्यांची निवड राज्यस्तरीय टीममध्ये झाली आहे.


या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य आर. पी. पाटील व शालेय समितीचे चेअरमन एन. एस. पाटील यांनी श्री. साबळे यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

 चंदगड मराठी अध्यापक संघाचे तालुका समन्वय रवींद्र पाटील , अध्यक्ष मोहन पाटील , जिल्हा प्रतिनिधी एम . एन शिवणगेकर यांनी अभिनंदन केले .


संजय साबळे यांची निवड ही चंदगड तालुक्यासाठी अभिमानास्पदबाब असून, त्यांच्या कार्यातून जिल्ह्यातील शिक्षकांसाठीही प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments