चंदगड तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचा माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्याहस्ते गौरव
कारवे ता. चंदगड (शिवसंदेश न्यूज ) :-चंदगड तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा देणाऱ्या निवृत्त शिक्षकांचा सन्मान समारंभ माजी आमदार मा. दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते महात्मा फुले विद्यालय, कारवे येथे संपन्न झाला. यावेळी सावंत यांनी शाल, ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व शिक्षकांचा गौरव केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य एम. एम. गावडे हे होते.
या कार्यक्रमात माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांप्रती आदर व्यक्त करत, त्यांच्या सेवेचा गौरव करत, “शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार असून, त्यांचे योगदान अमूल्य आहे,” असे मत व्यक्त केले.
![]() |
| म. फुले विद्यालयाचे नूतन प्राचार्य देवळ सर यांचा सत्कार करताना आमदार दत्तात्रय सावंत सर |
या मंचावर पुणे विभागीय संपर्क प्रमुख, राजेंद्र आसबे (सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे सचिव), आणि समाधान घाटगे (कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख) , गुलाबराव पाटील ,उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र पाटील यांनी करून उद्देश स्पष्ट केला.
या सत्कार समारंभात पुढील मान्यवर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला:
प्राचार्य एम. एम. गावडे (महात्मा फुले विद्यालय, कारवे) – सेवा: 37 वर्षे
मुख्याध्यापक अशोक खनगुतकर (श्री चाळोबा माध्य. विद्यालय, सातवणे) – सेवा: 30 वर्षे
प्रा. के. आर. गावडे (बी. डी. विद्यालय, रामपूर-डुक्करवाडी) – सेवा: 26 वर्षे
उत्तम रेडेकर (छ. शिवाजी हायस्कूल, माणगाव – मलतवाडी) – सेवा: 26 वर्षे
निर्मळकर एन. पी. (श्री सिद्धेश्वर हायस्कूल, कुदनूर) – सेवा: 36 वर्षे
एम. के. गावडे (जनता विद्यालय, तुर्केवाडी) – सेवा: 30 वर्षे
पी. जी. कांबळे (हायस्कूल, बागिलिगे-डुक्करवाडी, रामपूर) – सेवा: 26 वर्षे
या सर्वांना शाल , ग्रंथ व पुष्प देवून गौरविण्यात आले .
यासोबतच चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचा तालुका समन्वयक सीमाकवी रवींद्र पाटील (राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बुद्रुक) यांचा, त्यांना मिळालेल्या जिल्हास्तरीय नवोपक्रम पुरस्कार व ३३व्या कराड साहित्य संमेलनातील विशेष सन्मान या पार्श्वभूमीवर आमदार दत्तात्रय सावंत यांचा हस्ते शाल, शाहू महाराज गौरव ग्रंथ व पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार करण्यात आला.
सुत्रसंचालन शिवाजी मोहनगेकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक भोगुलकर सर यांनी मानले.



Post a Comment
0 Comments