"पारिजात प्लॅन्टेशन ग्रुप "तर्फे शिनोळी बु. येथे ५०० वृक्षांची लागवड
शिनोळी बु. (ता. चंदगड) : पर्यावरण रक्षण आणि परिसराचे हरित सौंदर्य जपण्यासाठी पारिजात प्लॅन्टेशन ग्रुपच्या पुढाकाराने शिनोळी बु. येथे भव्य वृक्षारोपण मोहीम पार पडली. ग्रामपंचायत शिनोळी बु. यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात एकूण ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
ग्रामपंचायत शिनोळी बु. यांच्या वतीने कलमेश्वर मंदिर येथे पारिजात प्लॅन्टेशन ग्रुपच्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
शिनोळी ग्रामपंचायत शाळेच्या पटांगणात सुपारीची झाडे तर मुख्य रस्त्याच्या कडेला व औद्योगिक वसाहतीत आंबा, वड, पिंपळ व जांभूळ यासारख्या बहुपयोगी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून राबवण्यात आलेला हा उपक्रम परिसरात आरोग्यदायी आणि नैसर्गिक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने मोलाचा ठरतो.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच गणपत कांबळे होते. उपसरपंच पुंडलिक गवसेकर यांनी 'परिजात प्लॅटेशन ग्रुपच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आणि "या सर्व झाडांचे संवर्धन ग्रामस्थांनी मिळून करण्याचा संकल्प करूया," असे उद्गार काढले.
या प्रसंगी विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक आप्पाराव पाटील,रा.शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. टी. भाटे, अक्वा अलाइज कंपनीचे शंकर सुर्यवंशी ,शिक्षक विक्रम तुडयेकर, सुभाष सावंत, सुभाष कदम , तानाजी पाटील ,ग्रा.पं सदस्य रामकृष्ण सुतार ,श्रीराम दूध संस्थेचे चेअरमन भरमाणा तानगावडे, तज्ञ संचालक रवींद्र रेडेकर, संचालक कृष्णा बोकमुरकर, नारायण गावडे, बडकु मेणसे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी निंगाप्पा पाटील, सुरेश कांबळे , एकनाथ राघोजी ,शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गावडे सर यांनी तर आभार प्रदर्शन रवी पाटील यांनी केले.
या उपक्रमामुळे गावात हरितक्रांतीचा नवा अध्याय सुरू झाला असून, भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवा, छाया व पर्यावरण संतुलन राखण्याचा आदर्श वाट दाखवण्यात आला आहे.




Post a Comment
0 Comments