Type Here to Get Search Results !

एम.के.पाटील यांचा मित्रपरिवाराकडून उत्स्फूर्त सत्कार

 मोहन कल्लोजी पाटील यांची मुख्याध्यापकपदी निवड

मित्रपरिवाराकडून उत्स्फूर्त सत्कार


बेळगाव (प्रतिनिधी) – राकसकोप गावचे सुपुत्र व मराठा मंडळ संस्थेमध्ये कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठ व विद्यार्थीप्रिय शिक्षक मोहन कल्लोजी पाटील यांची नुकतीच मराठा मंडळ हायस्कूल, बेळगाव येथे मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवाराने  पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष व सीमाकवी रवींद्र पाटील, तंत्रस्नेही व आदर्श शिक्षक रणजित चौगुले, मराठा बँक व्यवस्थापक संजय गुरव आणि गायक तानाजी पाटील या मान्यवरांनी पाटील सरांना विशेष भेट दिली व अभिनंदन केले.

मराठा बँक व्यवस्थापक संजय गुरव परिवारातर्फे सत्कार 


🌼 या प्रसंगी सीमाकवी रवींद्र पाटील यांनी सांगितले की, “मोहन सरांनी शिक्षण क्षेत्रात निष्ठा व सातत्याने केलेले कार्य हे प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्त्वात शाळा निश्चितच नवे शिखर गाठेल.”

🌟 रणजित चौगुले सरांनीही भावना व्यक्त करताना म्हटले, “मोहन पाटील सर हे विद्यार्थ्यांशी मनस्वी नातं जपणारे शिक्षक असून, मुख्याध्यापकपद हे त्यांच्या कर्तृत्वाला साजेसं यश आहे.”

तसेच शिवसंदेश भारत व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा यांचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांच्या या निवडीमुळे  मित्र परिवारालामध्ये गौरव वाढला आहे .

🎉 मोहन पाटील सरांना पुढील शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा! 🎉

Post a Comment

0 Comments