Type Here to Get Search Results !

चलो आझाद मैदान ; 8 व 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन ;

चलो ! आझाद मैदानावर...

8 व 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन 

 *शिक्षक समन्वय संघाचे आवाहन*
8 तारखेला सर्व शिक्षक आमदार आझाद मैदानात बसण्याच्या तयारीत...

मुंबई ( आझाद मैदानावरून ) :काल सभागृहात सर्व शिक्षक आमदारांनी 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार आर्थिक तरतूद व्हावी यासाठी सर्वच शिक्षक आमदारांनी लक्षवेधी च्या वेळी सभागृहात आवाज उठवला, 5 जून पासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू  असून 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे सर्व राज्यात शासनाविषयी असंतोष निर्माण झाला आहे,त्यावेळी  उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  यांनी त्याला उत्तर दिले की आम्ही देणार आहोतच, पण कसे द्यायचे याबाबत त्यांची चर्चा आम्ही आज संध्याकाळी करतो यावर मार्ग काढतो, चर्चा होणार होती,चर्चा झाली ही असेल आणि ती चर्चा होणारच, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी ही प्रश्न उपस्थित केला होता, त्यापूर्वी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे  यांनी एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन याबाबीत चर्चा केली होती,आमदार किशोर दराडे, आमदार जयंत आसगावकर आमदार अभिजित वंजारी  आमदार ज मो अभ्यंकर यांनी ही सभागृहात प्रश्न उपस्थित केला,व चर्चा केली आमदार किरण सरनाईक यांनी अतिशय सविस्तर मांडणी केली ,त्यांनी असे ही सांगितले की, 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने 5 जून पासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे तसेच शिक्षक समन्वय संघाने  8 व 9 जुलै रोजी सर्व शाळा बंद पुकारला असून 8 व 9 जुलै रोजी राज्यातील सर्व  शाळा बंद करून आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सर्व शिक्षक सहभागी होत आहेत  याचा विचार शासनाने करावा,

शाळा बंद चा विषय हा सभागृहात झालेला असल्याने सर्व राज्यात याची तीव्रता वाढली आहे त्यामुळे कोणी कारण सांगू नये,

सर्व आमदार महोदय सभागृहात आवाज उठवत आहेत,मैदानात आपल्या सर्वाचा आवाज वाढला पाहिजे .8 तारखेला सर्व शिक्षक आमदार आझाद मैदानात बसण्याच्या तयारीत आहेत.

*आपण सर्वांनी संस्थापक , मुख्याध्यापक यांना विश्वासात घेऊन अनुदानाचे गांभीर्य लक्षात आणून द्यावे* ,हे सर्व निश्चितच तुमच्या सॊबत असतील,

त्यामुळे राज्यातील सर्व शाळा बंद करून सर्वानी आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक समन्वय समितीतर्फे खंडेराव जगदाळे ,पुंडलिक रहाटे व संतोष वाघ यांनी आझाद मैदान मुंबई येथून केले आहे .

Post a Comment

0 Comments