Type Here to Get Search Results !

राजर्षी शाहू विद्यालयात एचपीव्ही लसीकरण मोहीम

 राजर्षी शाहू विद्यालयात एचपीव्ही लसीकरण मोहीम


चंदगड : - शिनोळी बु . (ता. चंदगड) येथील राजर्षी शाहू विद्यालय येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तुडये अंतर्गत उपकेंद्र शिनोळी खुर्द यांच्या वतीने, हसन मुश्रीफ फाउंडेशन व दिपिशा फाउंडेशन यांच्या सहकार्याने एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली .


या लसीकरण मोहिमेंतर्गत इयत्ता आठवी, नववी व दहावीतील 34 विद्यार्थिनींना भविष्यात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करणारी एचपीव्ही लस देण्यात आली. सरकारमान्य व पूर्णतः सुरक्षित असलेल्या या लसीकरणासाठी पालकांची संमती घेऊन लस देण्यात आली.


यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन.टी.भाटे सर  यांच्या हस्ते आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून करण्यात आले.

ग्रेस काळे मॅडम व प्रभाकर कुलकर्णी सर यांनी विद्यार्थिनींना या लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले.


यावेळी आरोग्य सहाय्यक तुकाराम नाईक , एलएचव्ही ग्रेस काळे मॅडम ,समुदाय आरोग्य अधिकारी प्रभाकर कुलकर्णी ,आरोग्य सेवक संजय आजले,आरोग्य सेविका स्मिता पाटील व शुभांगी पाटील,आशा वर्कर दीपा गुडेकर व लक्ष्मी तानगावडे,परिचारिका सुमन पाटील तसेच यावेळी एस बी कदम , सदाशिव पाटील , तानाजी पाटील उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवींद्र पाटील सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन विक्रम तुडयेकर सर यांनी केले.


ही लसीकरण मोहीम हे विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल असून, शाळा व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांची ही अनुकरणीय जाणीव ठरली आहे.

Post a Comment

0 Comments