अमरनाथ यात्रेसाठी सेवा करणाऱ्या बेळगावकर शिवभक्तांचा श्री महादेव समाज सेवा बटालाच्या वतीने सत्कार
बेळगाव (प्रतिनिधी): गेली तीन दशके अमरनाथ यात्रेकरूंना अखंड अन्नदान (लंगर) सेवा देणाऱ्या श्री महादेव समाज सेवा बटाला या संस्थेच्यावतीने यावर्षीही ही सेवा सुरू असून, या सेवेमध्ये सहभाग घेतलेल्या बेळगाव येथील श्री कपिलेश्वर मंदिराचे महिला सेवेकरी आणि पदाधिकारी यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या अन्नदान सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे अमरनाथ यात्रा सुरू झाल्यापासून ते समाप्त होईपर्यंत दिवस-रात्र अखंड सेवा अविरत सुरू असते. श्री महादेव समाज सेवा संस्थेने 30 वर्षांपासून ही परंपरा जपली असून, यामध्ये बेळगावचे शिवभक्त सोमनाथ हलगेकर हे गेले 25 वर्षे सातत्याने नेतृत्व करत आहेत.
यावर्षी बेळगावमधून श्री कपिलेश्वर मंदिराचे ट्रस्टी अजित जाधव, प्रसाद बाचुळकर यांच्यासह महिला सेवेकरी देखील या यात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्या कार्याची दखल घेत श्री महादेव समाज सेवा बटालाच्या वतीने विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
यावेळी उपस्थितांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या निस्वार्थ सेवेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अमरनाथ यात्रेसारख्या पवित्र यात्रेत सहभागी होऊन सेवा देणाऱ्या बेळगावकर शिवभक्तांचा हा सन्मान अभिमानास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments