आझाद मैदान आंदोलनासाठी चंदगड तालुका शिक्षक सज्ज!
"हजारोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार!"
कार्वे (प्रतिनिधी) –
दिनांक ८ व ९ जुलै २०२५ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या शिक्षक आंदोलनात चंदगड तालुक्यातील शिक्षकांचा मोठा सहभाग निश्चित झाला आहे.
गुरुवर्य म. भ. तुपारे जुनिअर कॉलेज, कार्वे येथे विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक संघटनेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत तालुक्यातील विविध शाळांतील शिक्षकांनी उत्स्फूर्त उपस्थिती नोंदवत आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी होणार असल्याची ग्वाही दिली.
शासनाच्या १४ ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी न झाल्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष वाढला असून, आपल्या हक्कासाठी निर्णायक लढा देण्याचा निर्धार बैठकीत दिसून आला.
शिक्षण व्यवस्था आणि शिक्षकांचा न्याय मिळवण्यासाठी होणाऱ्या या आंदोलनात चंदगड तालुक्यातील शिक्षक अग्रभागी राहतील, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
“आता गप्प बसणार नाही, रस्त्यावर उतरल्याशिवाय हक्क मिळत नाही” या निर्धाराने चंदगड तालुक्यातून शिक्षक आझाद मैदान गाठणारच!

Post a Comment
0 Comments