Type Here to Get Search Results !

सुजाता चौखंडे - माळी मॅडम यांची शिनोळी येथे सदिच्छा भेट

 पुणे शिक्षक मतदारसंघातील धाडसी महिला नेतृत्व!

सुजाता चौखंडे - माळी मॅडम यांची शिनोळी येथे सदिच्छा भेट


 चंदगड दि .26 : पुणे शिक्षक मतदारसंघातील धाडसी आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ.सुजाता चौखंडे -माळी मॅडम यांनी आज शिनोळी येथील ज्ञानदीप शिक्षण मंडळाच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली.


सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये भक्कम शिक्षक संपर्क आणि अडचणीत सापडलेल्या शिक्षकांच्या मदतीस तत्पर राहणाऱ्या सुजाता माळी या आजच्या काळात एक शिक्षकहितवादी नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.

शिक्षकांच्या विविध समस्या, सवलती, बदली प्रक्रिया, सेवासुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर त्या सातत्याने कार्यरत असून शिक्षकांच्या आवाजासाठी झगडणाऱ्या आघाडीच्या महिला म्हणून त्यांचा लौकिक आहे.


या भेटीदरम्यान शिक्षण व प्रशासन क्षेत्रातील अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

तत्पूर्वी देवरवाडी (ता. चंदगड) येथील पांडव कालीन वैजनाथ मंदिर  तीर्थक्षेत्रात श्रावण मासाच्या निमित्ताने भक्तिभावाने दर्शन घेण्यात आले.


या प्रसंगी मारुती माळी, अनिकेत माळी, अध्यक्ष प्रताप सूर्यवंशी, सचिव भरमा तुडयेकर, सीमाकवी रवींद्र पाटील, व विक्रम तुडयेकर यांची उपस्थिती लाभली.

सुजाता चौखंडे - माळी मॅडम यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर राजकीय पातळीवरही शिक्षकांच्या हक्कासाठी भक्कमपणे काम करावे, अशी सदिच्छा व शुभेच्छा यावेळी सर्व मान्यवरांनी दिल्या.

Post a Comment

0 Comments