देवयानी तानाजी पाटील जिल्हास्तरीय काव्यगायनात द्वितीय क्रमांकाने सन्मानित
![]() |
| सन्मान करताना मा.शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत व मान्यवर |
शिनोळी बुद्रुक (प्रतिनिधी):राजर्षी शाहू विद्यालयाची विद्यार्थिनी कु. देवयानी तानाजी पाटील हिने कोल्हापूर जिल्हास्तरीय काव्य गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत शाळेचा मान उंचावला.
ही स्पर्धा चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने आणि माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील 133 स्पर्धकांमधून देवयानीने प्रभावी सादरीकरण करून आपले वेगळेपण सिद्ध केले.
श्रीराम विद्यालय शिनोळी खुर्द येथे झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात तिचा पुणे शिक्षक मतदार संघाचे मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्याहस्ते सन्मान आकर्षक सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र, रोख रु .१५०१ / पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक एस. वाय.पाटील होते
या यशामागे मार्गदर्शक अध्यापक रवींद्र पाटील सर होते. यावेळी ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव सूर्यवंशी , सचिव बी.डी .तुडयेकर ,मुख्याध्यापक एन. टी. भाटे, सदाशिव पाटील , विक्रम तुडयेकर, अरुण सुर्यवंशी तसेच पालक तानाजी पाटील व विद्या पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले.
यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेली इयत्ता आठवीची विद्यार्थिनी श्रीया राजू बेळगावकर व इयत्ता नववीची विद्यार्थिनी जान्हवी विनोद सुतार, संस्कृती शाम पाटील , दिव्या शटुप्पा पाटील व स्वरांजली विलास रेडेकर या विद्यार्थ्यांनींना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.
देवयानीने संत जनाबाईंचे “धरीला पंढरीचा चोर” हे काव्य मनोभावे सादर करून परीक्षकांची दाद मिळवली यामुळे तीच्या यशामुळे शाळा व गावात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.


Post a Comment
0 Comments