लालबागच्या राजाच्या चरणी आमदार शिवाजी पाटील नतमस्तक प्रार्थना
मुंबई : आज चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल झाले. भक्तिभाव, श्रद्धा आणि समाधानाचा सुरेख संगम अनुभवत त्यांनी राजाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली.
आमदार म्हणाले, "कोणताही राजकीय वारसा नसताना एक शेतकरी पुत्र आमदार झाला तो फक्त बाप्पांच्या आशीर्वादामुळेच! चंदगड मतदारसंघाला विकसित मतदारसंघ बनवण्याचं माझं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बाप्पा मला देवो, हीच माझी प्रार्थना आहे."
या दर्शनावेळी आमदारांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments