"मुख्याध्यापकपदाचा सन्मान… सीमाकवी रवींद्र पाटील यांच्याहस्ते मोहन अष्टेकर सरांचा गौरव"
बेळगाव (प्रतिनिधी ): शांताबाई रामचंद्रराव धनाई हायस्कूल, कणबर्गी या नामवंत शिक्षणसंस्थेच्या मुख्याध्यापकपदी मोहन अष्टेकर सर यांची निवड झाल्याची आनंददायक बातमी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्साहाने स्वागतार्ह आहे.
अष्टेकर सर हे शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले, विद्यार्थिप्रेमी व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. याशिवाय ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सक्रिय सदस्य असून साहित्य चळवळीतील त्यांचे योगदानही लक्षणीय आहे. त्यांच्या या यशस्वी पदोन्नतीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष व सीमाकवी रवींद्र पाटील यांनी ' मित्र ' म्हणून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. या वेळी त्यांनी अष्टेकर सरांच्या शैक्षणिक आणि साहित्यिक कार्याची स्तुती करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमावेळी तानाजी पाटील, एम. बी. मळगली, संजय जे. पवार, एस. व्ही. धुळप्पनावर, विजय के. ताशिलदार, प्रवीण पाटील, रवी बेन्नकनावर, बसू धनाई, विद्या बेळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे वातावरण उत्साही, सुसंस्कृत आणि प्रेरणादायी होते.


Post a Comment
0 Comments