ॲड.पी.एस.पाटील यांचे दुःखद निधन
बेळगाव : डिफेन्स कॉलनी, हिंडलगा येथील सुप्रसिद्ध वकील ॲड. श्री. पी. एस. पाटील (वय ७३ वर्षे) यांचे आज बेळगाव जिल्हा न्यायालयामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले.
पाटील यांनी ४० वर्षांहून अधिक काळ बेळगाव तसेच महाराष्ट्रातील विविध न्यायालयांमध्ये वकिली व्यवसाय केला. ते दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य होते तसेच सह्याद्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत होते. समाजकारणातही ते सक्रिय होते. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांचे मूळ गाव बोकनुर असून ते सध्या डिफेन्स कॉलनी, लक्ष्मीनगर येथे वास्तव्यास होते.
त्यांचा अंत्यविधी आज दि १५ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यवधी होणार आहे.

Post a Comment
0 Comments