Type Here to Get Search Results !

शिवाजी विद्यापीठात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे शनिवारी व्याख्यान

 ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे शनिवारी व्याख्यान



कोल्हापूर, दि. ११ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठातील मराठी, हिंदी आणि इंग्रजी विभाग यांच्या वतीने येत्या शनिवारी (दि. १३) दुपारी १२ वाजता सरस्वती सन्मान विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे ‘भारतीय समाजवास्तव : लेखक व लेखनदृष्टी’ या विषयावर व्याख्यान आणि विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या गणित अधिविभागातील रामानुजन सभागृहा कार्यक्रम होईल, असे मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी कळविले आहे. 


डॉ. शरणकुमार लिंबाळे हे मराठी साहित्यातील प्रख्यात लेखक, कवी, समीक्षक आहेत. त्यांचे ‘अक्करमाशी’ हे आत्मकथन मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरलेले आहे. त्यांना ‘सनातन’ कादंबरीसाठी २०२० सालचा भारतीय साहित्यातील श्रेष्ठ असा सरस्वती सन्मान मिळाला.


 त्यांनी ४४ पुस्तके लिहीली आहेत. विशेष म्हणजे शिवाजी विद्यापीठाचे ते माजी विद्यार्थी आहेत. डॉ. लिंबाळे यांनी भारतीय साहित्य क्षेत्राला दिलेल्या योगदानासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजन गवस यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील असतील, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित असतील. तरी या कार्यक्रमासाठी साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments