रवळनाथ नगर कुद्रेमानीत ‘होम मिनिस्टर स्पर्धा’ गाजली –
पैठणीची मानकरी भारता रवळू पाटील!
कुद्रेमानी (शिवसंदेश न्यूज) : रवळनाथ नगर कुद्रेमानी येथे श्री महालक्ष्मी दुर्गामाता युवक मंडळाच्या वतीने नवरात्री निमित्त भव्य ‘होम मिनिस्टर स्पर्धा – 2025’ उत्साहात पार पडली. “खेळ पैठणीचा – सन्मान नारीचा” या घोषवाक्याखाली भरलेल्या या कार्यक्रमात महिलांच्या उस्फूर्त सहभागाने आणि आनंदी वातावरणाने नवरात्रीचा सोहळा अधिक मंगलमय झाला.
🏆 स्पर्धेत मानकरी ठरले :
🥇 प्रथम – भारता रवळू पाटील
🥈 द्वितीय – छाया राजेंद्र बडसकर
🥉 तृतीय – वर्षा सदानंद पाटील
4️⃣ चौथा – आरती मारुती राजूकर
5️⃣ पाचवा – रुक्मिणी मारुती मुरकुटे
प्रथम क्रमांक विजेत्यास पैठणी साडी व रु.5000/- जलधारा साडी सेंटर, कोल्हापूर यांनी बहाल केले. तसेच द्वितीय क्रमांक मिक्सर, तृतीय क्रमांक कुकर, चौथा क्रमांक कळशी व पाचवा क्रमांक डिनर सेट अशी आकर्षक पारितोषिके देऊन मानकरी महिलांचा सन्मान करण्यात आला.
✨ कार्यक्रमाची खरी शोभा सूत्रसंचालनात! ✨या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले रवींद्र पाटील सर (भावोजी) यांचे भारदस्त, आकर्षक व उत्साही सूत्रसंचालन. त्यांच्या ओघवत्या शैलीने संपूर्ण कार्यक्रम रंगतदार झाला. प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद, टाळ्यांचा कडकडाट आणि महिलांचा आनंद यामुळे वातावरण आणखी रंगले.
👥 मंडळाचे पदाधिकारी :
अध्यक्ष – दयानंद राजाराम पाटील
उपाध्यक्ष – निलेश शंकर पाटील
सचिव – वैजनाथ नागोजी पाटील
खजिनदार – कल्लप्पा मारुती पाटील
मार्गदर्शक – वैजनाथ मल्लाप्पा बिजगर्णीकर
खंबीर नेतृत्व – रवळू दत्तू पाटील
मूर्ती देगणीदार – मनोहर भुजंग लोहार
यावेळी मंडळाचे सर्वेसर्वा अंकूश सुतार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवत ‘पैठणीची शान’ साजरी केली आणि समाजासमोर महिला सशक्तीकरणाचे सुंदर उदाहरण घालून दिले.


क्षणचित्रे pn phayla uplbdh zali asti tr bre zale aste
ReplyDelete