एक हात मदतीचा...! आमदार शिवाजी पाटील यांचे पूरग्रस्तांसाठी भावनिक आवाहन
चंदगड ( शिवसंदेश News):महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो कुटुंबे पूरग्रस्त होऊन संकटात सापडली आहेत. जनजीवन विस्कळीत झाले असून लाखो लोक अन्न, पाणी व निवाऱ्यावाचून हालअपेष्टा सहन करत आहेत. या पार्श्वभूमीवर चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या बांधवांना मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन केले आहे.
"काही वर्षांपूर्वी आपणही महापूराचा सामना केला होता. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने आपल्याला मदतीचा हात दिला होता. आज आपली वेळ आहे पूरग्रस्त बांधवांच्या मदतीस धावून जाण्याची," असे आमदार पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
पूरग्रस्तांना सध्या कोरड्या शिध्याची सर्वाधिक आवश्यकता असल्याचे सांगून त्यांनी पुढे म्हटले की, "तुमच्या छोट्याशा योगदानामुळे कुणाच्या पोटात अन्नाचा घास जाईल, कुणाच्या डोळ्यांत पुन्हा आशेचा किरण दिसेल."
प्रत्येक घरातून किमान एक किलो तांदूळ , नाचणी , डाळ ,पीठ , गुळ ,साखर ही धान्ये व कडधान्ये गावावातून सढळ हाताने मदत करावी.
संकटाच्या या काळात सर्वांनी एकदिलाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उभे राहावे, असे आवाहन आमदार शिवाजी पाटील यांनी मतदारसंघाच्या मायबाप जनतेला केली आहे .
.jpeg)
Post a Comment
0 Comments