Type Here to Get Search Results !

अर्थव दौलत साखर कारखान्याचा विस्तारीकरण सोहळा 25 ऑक्टोबर रोजी

 हलकर्णीत ‘अथर्व-दौलत’ साखर कारखान्याचा नवा विस्तार!

पर्यावरणपूरक 32.4 मेगावॅट को-जन प्रकल्पाची भव्य पायाभरणी 25 ऑक्टोंबरला 



चंदगड (प्रतिनिधी) :चंदगड तालुक्याच्या औद्योगिक नकाशावर सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल असा सोहळा — ‘अथर्व-दौलत साखर कारखाना, हलकर्णी’ येथे येत्या शनिवार, दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता पार पडणार आहे. या दिवशी 2025-26 गाळप हंगामाच्या मोळी पूजनासोबतच 32.4 मेगावॅट क्षमतेच्या अत्याधुनिक, पर्यावरणपूरक को-जन प्रकल्पाची पायाभरणी केली जाणार आहे.


या ऐतिहासिक सोहळ्याचे उद्घाटन चंदगडचे आमदार मा. शिवाजीभाऊ पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून, काटा पूजन सौ. व श्री. विमल मधुकर करडे यांच्या हस्ते पार पडेल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील भूषवणार असून, दौलत विश्वस्त संस्थेचे चेअरमन अशोकराव जाधव प्रमुख उपस्थित राहणार आहेत.


हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील (दक्षिण भागातील) सर्वात मोठा आणि ऊर्जानिर्मितीच्या नव्या युगाचा प्रारंभ ठरणारा असल्याने, स्थानिक शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या सोहळ्याला सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व ‘दौलत’ परिवाराचे हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चेअरमन मानसिंगराव खोराटे, संचालक पृथ्वीराज खोराटे व मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी केले आहे.

 ‘दौलत’चा नवा अध्याय — विकास, विश्वास आणि ऊर्जेचा प्रकाश! 




Post a Comment

0 Comments