Type Here to Get Search Results !

चंदगड, आजरा व गडहिंगलज तालुक्यातील शाळांना 9 कोटी 90 लाखांचा निधी मंजूर - आमदार शिवाजी पाटील

 चंदगड, आजरा व गडहिंगलज तालुक्यातील शाळांना 9 कोटी 90 लाखांचा निधी मंजूर - आमदार शिवाजी पाटील 



चंदगड (प्रतिनिधी):शिक्षण विभाग प्राथमिक - जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत चंदगड, आजरा आणि गडहिंगलज तालुक्यातील शाळांसाठी तब्बल ₹9 कोटी 90 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. शैक्षणिक विकासासाठी दिलेला शब्द पाळत आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगड विधानसभेतील शाळांसाठी मोठी आर्थिक मदत मिळवून दिली आहे. 

आमदार शिवाजीभाऊंनी निवडणुकीपूर्वी मतदारांना दिलेला शब्द — “चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार” — आता प्रत्यक्षात उतरतो आहे. आमदारकीच्या पहिल्याच वर्षात त्यांनी शैक्षणिक उन्नतीसाठी सातत्याने पाठपुरावा करत हा निधी मिळवून दिला आहे.


या निधीमुळे ग्रामीण भागातील शाळांना आवश्यक सुविधा मिळणार असून, विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगले शैक्षणिक वातावरण तयार होईल.

स्थानिक शिक्षक व पालकांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार शिवाजीभाऊ पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.

🟢 “शिक्षणासाठी झटणारे नेतृत्व – शिवाजीभाऊ!”

🟣 शब्द दिला आणि शब्द पाळला – लोकनेतृत्वाची खरी ओळख!


Post a Comment

0 Comments