Type Here to Get Search Results !

उपक्रमशील शिक्षक अर्जुन हराडे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’

 उपक्रमशील शिक्षक अर्जुन हराडे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’



कोल्हापूर : गंगाधर साहित्य परिषद, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित मराठी साहित्य संमेलन २०२५ हे मिरज येथील ऐतिहासिक पटवर्धन हॉलमध्ये ९ ऑक्टोबर रोजी अत्यंत उत्साहात पार पडले.


या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक भिमराव धुळुबुळू यांनी भूषवले होते. उद्घाटन समारंभ डॉ. श्रीपाल सबनीस (अध्यक्ष, ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक श्री. किसनराव कुराडे सीमाकवी श्री रवी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा संपन्न झाला. अर्जुन हराडे हे मूळचे सीमाभागतील खवनेवाडी गावचे राहिवासी असून सध्या नोकरीनिमित्त गडहिंग्लज येते कार्यरत आहेत


या भव्य संमेलनात गंगाधर साहित्य परिषदेमार्फत देण्यात येणारा “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार”

 सौ. विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज चे विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील आणि सर्जनशील शिक्षक श्री. अर्जुन हराडे यांना त्यांच्या पत्नी सौ. मधुरा हराडे यांच्यासह प्रदान करण्यात आला.


शिक्षण, साहित्य, संस्कृती या क्षेत्रातील त्यांच्या बहुमोल योगदानाची दखल घेत हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे, विविध उपक्रमांतून शाळेचे नाव उज्ज्वल करणारे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात.


या सोहळ्यास अनेक मान्यवर साहित्यिक, रसिक श्रोते, शिक्षक व समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. सन्मानाचा हा क्षण उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

उपक्रमशीलतेचा आदर्श – श्री. अर्जुन हराडे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments